Banner image Slambook365

[500+] प्रेरणादायी विचार मराठी | Motivational Quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये आपण प्रेरणादायी विचार मराठी | Motivational Quotes in Marathi पाहणार आहोत.

मित्रांनो जेव्हा आपल्याला आयुष्यात हरल्यासारखं वाटतं किंवा सर्प संपून गेल्यासारखं वाटतं तेव्हा आपल्याला प्रेरणादायी विचार बळ देण्याचं काम करत असतात. 

अशा वेळी आपण अशा व्यक्तींना प्रेरणादायी मेसेज देऊन त्यांच्या जीवनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम करत असतो. एक प्रेरणादायी विचार माणसाचे आयुष्य बदलून टाकतो.

Motivational Quotes in Marathi

तुम्ही असेच पॉझिटिव्ह प्रेरणादायी विचार शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. इथे आम्ही मराठी प्रेरणादायी विचार [Motivational Quotes in Marathi] दिले आहेत जे आपण आपल्या मित्र व नातेवाईकांबरोबर किंवा व्हाट्सअप वर शेअर करून त्यांना सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करू शकता.

Motivational Quotes in Marathi

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य तयार करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. ✨💪

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की, दुसऱ्याच्या चुका शोधण्यासाठी वेळच उरणार नाही. 🙌🕰️

तुम्ही प्रत्येक वेळी नवीन चूक करत असाल, तर नक्की समजा की तुमची प्रगती होत आहे. 🚀🔍

नियती जेव्हा काही हिरावून घेते, तेव्हा त्यापेक्षा मोठं काहीतरी देण्यासाठी ओंजळ रिकामी करते. 🙏🌟

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर थोडं दुःख सहन करायला हरकत नाही. 💖🤝

निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका. ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांचं मत बदलतं. 🎯🔥

असंख्य समस्यांची दोनच कारणं असतात—विचार न करता कृती करणे किंवा कृती करण्याऐवजी विचारातच गुंतून राहणे. 🤔➡️⚡

लाटा ज्या पायाला स्पर्श करतात, त्याच लाटा मोठ्या बोटी बुडवू शकतात. 🌊⚓

सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी ठेवावी लागते. 🌞💪

लोकांचं तुमच्याबद्दल मत काय आहे यापेक्षा तुम्ही स्वतःला कसं पाहता, हे महत्त्वाचं आहे. 🌟👤

मनुष्याचं मोठेपण वयावर नव्हे, तर कर्तृत्वावर अवलंबून असतं. 🏆🎉

जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक शिकवणारे असतात. 📘💡

अपमानाच्या पायऱ्यांवरूनच ध्येयाचा डोंगर चढावा लागतो. 🪜⛰️

संयम हा यश मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. 🧘‍♂️🎯

अपमान गिळायला शिका; उद्या तेच लोक तुमची ओळख सांगण्यासाठी स्पर्धा करतील. 🏅👥

सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं. 🌈💼

 Motivational quotes In marathi for students

सर्वसामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आपली असामान्य ओळख कधीच समजणार नाही. 🌟🛤️

प्रत्येक पाऊल योग्य नसतं, पण धोके पत्करून शिकणारेच ध्येय गाठतात. 🧗‍♂️📈

कधी कधी परिस्थिती बदलत नाही, कारण देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते. 🙌

हजारो माणसे भेटतील, पण चुका माफ करणारे आई-वडील पुन्हा मिळणार नाहीत. 👨‍👩‍👧💖

गरज संपली की विसरणारे खूप असतात; पण गरज नसताना आठवण काढणारे फारच कमी असतात. 💭👫

मेहनत इतक्या शांततेने करा की, तुमचं यश आवाज करेल. 🔔🎉

हार आणि जीत तुमच्या मनस्थितीवर अवलंबून असते. ठरवलं तर जीत तुमचीच आहे. 🏆🎯

गेलेला काळ बदलता येत नाही, पण येणारा काळ तुमच्या हातात आहे. 🕰️🌅

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असेल, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. 🌟💪

आपल्या नियतीचे मालक बना, परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. 🕊️🎯

काही गोष्टी बोलून नाही तर करून दाखवायच्या असतात. 🛠️🚀

आनंदी आयुष्य वस्तूंनी नाही, स्वभावाने कमावलेल्या माणसांनी अधिक समृद्ध होते. 🤝💖

सकारात्मक विचार केल्यावर नकारात्मक काहीही शिल्लक राहत नाही. 🌈✨

जीवनातल्या काही जखमा दिसत नसल्या तरी मनाला सतत ठसठसत असतात. 💔🌱

मन शांत केल्यावर सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. 🧘‍♀️☮️

कोणतेही कार्य अडथळ्यांशिवाय पार पडत नाही; शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्यांनाच यश मिळते. 🏁💼

संकटं तुमच्यातली जिद्द आणि सामर्थ्य उघड करण्यासाठी येतात. 🌪️🔥

जगाशी प्रामाणिक राहण्याआधी स्वतःशी प्रामाणिक राहा. 🌟💡

जे झालं त्याचा विचार न करता, जे होणार आहे त्याकडे लक्ष द्या. 🕰️➡️

दगडाला देवपण मिळवायचं असेल, तर टाकीचे घाव सोसावेच लागतात. 🪨✨

यश न मिळणे म्हणजे अपयशी होणे नव्हे. तो एक नवा प्रयत्न करण्याचा मार्ग असतो. 🚶‍♂️🌈

नशिबाचे दरवाजे मेहनतीनेच उघडले जातात. 🔑🛠️

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर नवीन वाटा मोकळ्या करण्यासाठी येतात. 🌪️🌅

मागे चर्चा सुरू असल्यास, समजा तुम्ही पुढे जात आहात. 🗣️🏃‍♀️

 Life Quotes In Marathi

सर्व प्रश्न सोडवून सुटत नाहीत; काही सोडून दिल्यावर आपोआप सुटतात. 🌊🙌

स्वाभिमान टिकवून लहान राहणं, अभिमान विकून मोठं होण्यापक्षा नेहमीच चांगलं. ✊🌟

क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हा सर्वोत्तम उपाय आहे. 🔥

प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण गेलेला वेळ परत येत नाही. 🎉⏳

सुंदर चरित्र आणि कर्तव्य उसने मिळत नाही; ते स्वतःच निर्माण करावे लागते. 📜🛠️

यशस्वी लोक इतर काय करत आहेत याचा विचार न करता स्वतःच्या मार्गावर काम करतात. 🌟🎯

यश म्हणजे इतरांना माहीत नसलेली गोष्ट जाणून घेणे. 📚🔑

आयुष्यात कामाआधी यश हे फक्त शब्दकोशातच दिसते. 📖💼

पत्त्यांच्या खेळात मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे हेच यश आहे. 🃏🏆

यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची जिद्द प्रबळ असावी. 💪🚀

स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करू नका आणि स्वतःचा उपयोग कणाला करू देऊ नका. 🚫🤝

कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. शांत राहून निर्णय घ्या. 🌬️

मनात आणलं तर जगात अशक्य काहीच नाही. 🙌🌟

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. 😊

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. 🌟

यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग अगदी एकसारखाच आहे. 💪

संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. 🎯

तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागेमागे येईल. 🚀

काही लोकं यशाची स्वप्नं बघतात, तर काही जण उठून कामाला सुरूवात करतात. 

यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने करा. ✨

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात - एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. 📚

न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. 🍀

हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. 😊

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. 🌈

सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. 🌊

कर्म जेव्हा वसुलीवर येते, त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही. त्यामुळे कर्माशी आणि कार्याशी प्रामाणिक राहा. 

आपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका. 

 Good thoughts In Marathi short

मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधीकाळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो.

जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा आधी हरलेले असतात. 🏆

माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. 🔭

आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. 😊

हिंमत एवढी ठेवा की, नशिबालाही झुकावं लागेल. 🔥

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. 💪

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. 🙏

अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या तरच यश मिळालं असं समजा. 🌟

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यापासून शिका आणि पुन्हा सुरवात करा. 🔄

पराभवाची भीती बाळगू नका, एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.🏅

सर्वात मोठा रोग - "काय म्हणतील लोक". 🤷‍♀️

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहाव्या लागतील. ♟️

अशा ठिकाणी कधीही जाऊ नका, जिथे तुम्हाला बोलावलं नसेल. स्वतःचं महत्त्व कमी करू नका. 🚪

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. 🙌

जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. 🌼

तुमच्या जगण्यावर लोकांना इतकाही अधिकार देऊ नका की कोणीही येईल आणि तुमचा अपमान करून जाईल. 

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्याने लढायला शिका. 🛡️

तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय, यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. 🗝️

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. 

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील, तर तुमची ध्येये खूपच लहान आहेत. 🎯

पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर आत्मविश्वास जिंकाल, आणि हरलात तर अहंकार हराल. 🏅

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत. 💖

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणं जास्त श्रेष्ठ. 💧

जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणे भागच पडेल. 

वाईट दिवसांशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. 

स्वतःचं स्पष्टीकरण देण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. 

 motivational quotes in marathi for success

पराभवाची भीती सोडा; एक मोठा विजय सगळं बदलू शकतो. 💪

कोण काय बोलतं याकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या यशावर लक्ष द्या. ✨

स्वप्नं ती असतात जी झोपू देत नाहीत. 🌙

दुःख कायमचं राहत नाही, फक्त हिंमत ठेवायला हवी. 🌈

सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलावं लागतं. 

सुट्टी म्हणजे शिकण्याची नवी संधी. 📚

मोठ्या ध्येयांसाठी मोठ्या अडचणी येतात. 🏔️

आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे अपयशाचं मूळ कारण. 🌟

कुणालाही छोटं समजू नका; प्रत्येकाचं सामर्थ्य वेगळं असतं. 🐜

चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जा. 🛤️

चुकल्यावर माफी मागा, अन् दुसऱ्यांना चुकल्यावर माफ करा. ❤️

मैत्रीचे धागे नाजूक असतात पण तुटण्यास अवघड. 🤝

कागदावर लिहिलं जातं तेव्हा अहंकार सर्टिफिकेट होतो. 📝

चांगल्या विचारांनी आयुष्य सुंदर बनतं. 🌸

ठाम निर्धार असलेलेच प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकतात. 💪

गमावल्यापेक्षा कमावलेल्या गोष्टींवर लक्ष द्या. 🌟

दुःख मिरवण्यापेक्षा आनंद वाटा. 😊

वर्तमानाच्या त्यागातून भविष्य उभं राहतं. 🌱

बचत मधमाश्यांकडून शिकावी. 🐝

खाचखळगे पार करूनच समुद्र गाठता येतो. 🌊

मूर्खांशी संवाद न करता मौन राखणं योग्य. 🤐

मोहाची पहिली पायरी म्हणजे पापाची सुरुवात. ⚠️

थोडं नुकसान चालेल, पण शत्रू निर्माण करू नका. 🤝

संयम हा मोठा गुण आहे. 🌟

ज्या गोष्टी बदलू शकत नाहीत त्यांच्यामुळे दुःखी होऊ नका. 🌈

दगडाचा योग्य वापर तुम्हाला इतरांच्या डोक्यावर घेऊन जाईल.🙏

दुःख भोगणारा हसण्याची खरी किंमत ओळखतो. 😊

प्रत्येक क्षण अमूल्य आहे; तो आनंदाने जगा. 🦋

दिवसात समस्या नाहीत? मग तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. 🛣️

पवित्रता, धैर्य, आणि उद्योग – जीवनाचे तत्त्व. 🌟

लक्ष्य गाठल्याशिवाय थांबू नका. 🏃

विचार सत्यात उतरवण्यामध्ये संघर्ष आहे. 💡

रिकामा खिसा माणसं दाखवतो; भरलेला खिसा जग दाखवतो. 🛍️

समजावण्यापेक्षा समजून घेण्यात खरी परीक्षा असते. 🤝

विजेते वेगळं करतात; प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. 🏆

कर्तृत्व सिद्ध झाल्यावर संशय आदरात बदलतो. 🙌

स्वप्नांवर काम करा, झोपू नका. 🌙

संघर्ष म्हणजे देवाची देणगी, ज्यांच्यात झेलण्याची ताकद आहे त्यांना मिळते. 💪

मन तोडलं तर निराश होऊ नका; गोड झाडावरच दगड मारले जातात. 🍎

इच्छा दांडगी असेल, तर मदत आपोआप मिळते. 

"जीवनात काहीही मिळवायचं असेल तर, तुमचं लक्ष्य निश्चित करा आणि त्यावर मनापासून काम करा." ✨

"यशाचा मार्ग तयार करण्यासाठी हिमतीने पुढे जा, कारण सर्वात जवळचा मार्ग तुमच्याच कष्टांत आहे." 💪

"चांगल्या हृदयाने नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती आयुष्यभर टिकतात." ❤️

"हिमतीने हरलं तरी चालेल, पण कधीही हिम्मत हरु नका." 🌟

 motivational quotes in marathi text

"समुद्रात कितीही वादळ आलं तरी तो शांत राहतो. आपणही आपल्या शांततेचं रक्षण केलं पाहिजे." 🌊

"गरुडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडणं थांबवत नाही." 🕊️

"अडथळ्यांशिवाय कोणतंही मोठं कार्य होत नाही, पण शेवटपर्यंत प्रयत्न करणारेच यश मिळवतात." 🎯

"मोठी स्वप्नं पाहणारेच ती सत्यात उतरवतात." 🌠

"कधी कधी विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं." 🌀

"जर प्रयत्न केले नाहीत, तर नशिबाला दोष देण्याचं तुम्हाला काहीही कारण नाही." 

"पंख फक्त पक्ष्यांसाठी असतात, माणूस जमीनीवर राहूनही उंच झेप घेऊ शकतो." 🦅

"अपमानाचा बदला भांडून नाही, तर जास्त यशस्वी होऊन घ्या." 🔥

"एकावेळी एकच काम करा, पण ते इतकं उत्कृष्ट असू द्या की सगळे त्याची दखल घेतील." 🌟

"प्रभाव वाढला की बदनामी अटळ आहे, पण त्यातून शिकून यशस्वी होणं महत्वाचं आहे." 🌈

"कारण सांगणारे कधीही यशस्वी होत नाहीत; यशस्वी होणारे कारण सांगत बसत नाहीत." 🏆

"जर तुम्हाला कोणी नाकारलं, तर समजा त्या व्यक्तीला तुमची किंमत समजली नाही." 💡

"ध्येय निश्चित ठेवा, पद्धती बदलायला घाबरू नका." 🚀

"साहसी लोकांनाच भाग्याची साथ मिळते." 🍀

"यशाचा सर्वात मोठा वाटा अपयशातच असतो." 🌟

"काम आवडीने करा, कारण तेच महान बनण्याचा मार्ग आहे." 💼

"जिंकणारे वेगळं काही करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात." 💡

"नात्यांमध्ये सुंदरता दोष स्वीकारण्यात आहे. परिपूर्ण व्यक्तीच्या शोधात राहिलात, तर एकटेच राहाल." 👫

"मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनीच मनुष्य अधिक शोभतो." 💪

"मदत करणाऱ्या व्यक्तींविषयी नेहमी कृतज्ञ रहा." 🙏

"जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच काहीतरी नवीन सुरु होत असतं." 🌟

"खाली खेचणारे नेहमी तुमच्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात." 🔝

"नोकर होणं सोपं आहे; मालक होण्याचं स्वप्न पाहा." 💼

"प्रार्थना कधीही वाया जात नाही; योग्य वेळ आली की त्याचं फळ मिळतं." 🙌

"जीवनात कधीही वारंवार अपयश आलं तरी तुमचा उत्साह कमी होऊ देऊ नका." 🔥

"तुमचं यश किती मोठं आहे, हे त्यासाठी गमावलेल्या गोष्टींवरून ठरवा." 🌈

कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसणं साहस नाही, तर आपल्या भीतीवर मात करणं हे खरे साहस आहे. 🌟

 motivational quotes in marathi for study

प्रत्येक दिवस हा आयुष्य बदलण्याची नवी संधी घेऊन येतो. 💡

दुःख प्रत्येक वेळी एक नवा धडा देतं, आणि तो धडा आपलं आयुष्य बदलून जातो. 🌈

स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचं गुपित आहे. 🗝️

दुसऱ्याच्या सावलीखाली उभं राहून स्वतःची सावली निर्माण होत नाही, त्यासाठी स्वतः उन्हात उभं राहावं लागतं. ☀️

ध्येय उंच असेल, तर झेप देखील उंचच घ्यावी लागते. 🎯

आयुष्यात स्पष्टीकरण देण्याची गरज नाही; ज्यांना तुमची कदर आहे, त्यांना ते लागत नाही, आणि ज्यांना नाही, त्यांना कधीच पटत नाही. 

ध्येय दूर दिसतंय म्हणून रस्ता सोडू नका. 🛤️

कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडू नका. 💪

स्पर्धा कुणाशीच नसावी; फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. 🔥

संघर्ष मोठा असेल, तर समजावं की देवाने तुम्हाला निवडलं आहे. 🌟

चांगल्या माणसांचा शोध घेण्यापेक्षा स्वतः चांगले व्हा, कुणीतरी तुमच्यापर्यंत पोहोचेल. 🌼

सत्य एकदाच खर्च करावं लागतं आणि आयुष्यभर त्याचा आनंद घेता येतो; असत्यामुळे तात्पुरतं सुख मिळतं पण कायमचं ओझं उरतं.

सर्व काही ठिक होईल, कदाचित आज नाही पण लवकरच! 🌈

जेव्हा हार मानण्याचा विचार येतो, तेव्हा आठवा का सुरुवात केली होती. 🌟

परिस्थिती आणि लोकांमुळे निराश होण्याची गरज नाही; त्यांना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. ✨

तणाव हाताळता आला नाही, तर यशही हाताळता येणार नाही. 🌊

यश सावलीसारखं आहे; ते पकडायचा प्रयत्न करू नका, फक्त योग्य दिशेने चालत राहा. 🌟

समस्या असतील तरच यशाचा आनंद घेता येतो. 🌻

शिकत राहा; अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. 📚

संघर्ष जितका मोठा, यश तितकं तेजस्वी असतं. 🌠

नाती टिकवण्यासाठी अहंकार सोडा, नाती नाही. 🤝

गैरसमज दूर करण्यासाठी एकमेकांशी बोला, एकमेकांविषयी बोलू नका. 🗣️

काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ शिकवतात. 🌿

चुकलंय असं वाटलं तर योग्य मार्ग निवडण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. 🌟

अशक्य हा शब्दच डोक्यातून काढून टाका. 🚀

संयम राखणे हे शौर्याचं खरे लक्षण आहे. 🕊️

इच्छाशक्ती असेल, तर मदत आपोआप तुमच्याकडे येते. 🙌

कृती करण्याची वेळ आली की विचार थांबवा आणि कामाला लागा. 🔨

रिजेक्शनमुळे निराश होऊ नका; महत्त्वाच्या गोष्टी सामान्य लोक स्वीकारत नाहीत. 💎

पाण्याचा थेंब कुठे पडतो त्यावर त्याचं मूल्य ठरतं; सोबत नेहमी योग्य निवडा. 🌊

कोणत्यालाही छोटं समजू नका; प्रत्येकात काहीतरी खास असतं. 🐜

स्वतःचा फोटो पटकन मिळतो, पण प्रतिमा बनवण्यासाठी वेळ लागतो. 📸

लक्ष केंद्रित करून इंद्रिय संयम ठेवल्यास एकाग्रता मिळवता येते. 🎯

स्वतःवर विश्वास असेल, तर देवावरही विश्वास निर्माण होतो. 🙏

लोकांची स्तुती किंवा निंदा महत्त्वाची नाही; तुमचं ध्येय महत्त्वाचं आहे. 🏹

जे तुमच्या यशावर जळतात, तेच तुम्हाला उत्कृष्ट मानतात. 🔥

पराजयाच्या भीतीतून पुन्हा विजयाची तयारी करा. 🛡️

संकटांवर विजय मिळवल्यावर इतिहास घडतो. 📜

 motivational quotes in marathi good morning

खऱ्या ताकदीसाठी एकट्याने लढायला शिका. 🏞️

स्वतःवर पैज लावा; जिंकलात तर आत्मविश्वास, हरलात तर अहंकार हरवाल. 🌟

🌟 एखाद्याला गुन्हेगार ठरवण्यापूर्वी स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघा; तुमचं मत बदलू शकतं.

✨ भूतकाळ आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ स्वप्नांचा, पण वर्तमानकाळ मात्र खऱ्या आयुष्याचा आनंद देतो.

👀 सगळ्यात सुंदर नातं दोन डोळ्यांचं असतं – ते एकाच वेळी उघडझाप करतात, रडतात आणि झोपतात, तेह एकमेकांना न पाहता

🧘 आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं.

🤝 प्रेमाने जग जिंकलं जाऊ शकतं; शत्रुत्वाने नाही.

⏳ आयुष्य बदलायला वेळ मिळतो, पण वेळ बदलायला आयुष्य कधीच मिळत नाही

💪 त्यांना दोष देऊ नका जे तुम्हाला सोडून गेले; उलट असं काहीतरी करा की त्यांना पश्चाताप झाला पाहिजे.

🌺 मोठ्या व्यक्तींशी संवाद साधा ज्यांच्यासोबत सकारात्मकता जाणवते.

🛤️ सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाहीत; काही गोष्टींसाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं.

🦅 संघर्ष एकटाच असतो, पण यशानंतर सगळं जग तुमच्या मागे असतं.

🏆 मोठा अडथळा म्हणजे विजय जवळ असल्याचं लक्षण आहे.

💭 स्वप्नं पाहायचीच असतील तर मोठी पाहा, कारण लहान स्वप्नं रक्त ढवळत नाहीत.

🧗 त्रास फक्त जबाबदारी स्वीकारणाऱ्यांना होतो; पण हेच लोक कधीच हरत नाहीत.

🔥 यशाची इच्छा अपयशाच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

💼 लोक तुमचं संयम आणि सन्मान कसा ठेवता हे पाहून ओळखतात

🌸 डोकं शांत असेल, तर निर्णय चुकत नाहीत; भाषा गोड असेल, तर माणसं तुटत नाहीत.

⏳ शून्यापासून सुरुवात करा, कारण शून्यापुढची संख्या तुम्ही ठरवता.

🌱 स्वतःचा विकास करा; वाढ म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे.

📚 चांगली माणसं आणि पुस्तके वाचून समजतात.

🌈 चांगल्या गोष्टींसाठी वाईट परिस्थितीतून जाणं गरजेचं असतं.

💞 गरज असताना कोण तुमच्यासोबत आहे, याला महत्त्व आहे.

🌻 प्रसन्न मनच दुःख दूर करू शकतं.

🌙 दुःखात झोप येत नाही, सुखात झोप लागत नाही; यालाच आयुष्य म्हणतात.

🔦 आत्मविश्वास असलेला माणूस काळोखातूनही मार्ग काढतो.🧊 डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर असेल, तर प्रश्न सुटतात

🎯 अनावश्यक गरजा वाढवू नका; आयुष्य सुलभ होईल.

💼 कर्तव्यावर चालायचं ठरवलं, की भावना बाजूला ठेवाव्याच लागतात.

🌟 प्रयत्न शेवटपर्यंत करा – यश मिळेल किंवा अनुभव, दोन्ही अमूल्य आहेत

🌟 संकटं यशाचा आनंद अधिक गोड बनवतात.

🚀 ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास हाच मार्गदर्शक असतो.

 मराठी मोटिवेशनल कोट्स

🥇 जिंकणं म्हणजे नेहमी पहिला येणं नाही; स्वतःला आधीपेक्षा चांगलं सिद्ध करणंही जिंकणं आहे.

💬 आयुष्य कठीण आहे; तक्रारी त्याला सोपं करत नाहीत, फक्त प्रयत्न करत राहा.

🌪️ विपरीत परिस्थितीतही यश मिळवणं हीच खरी ताकद आहे.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार!

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते.

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका

कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत रातो.

प्रयत्न सोडू नका, सुरूवात नेहमी कठीणच असते.

जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते, तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा

जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील

तलाव जेव्हा पाण्याने भरतो, तेव्हा मासे किड्यांना खात असतात, तलावतलं पाणी संपून कोरडा होतो, तेव्हा किडे माशांना खात असतात, संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन

क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं.

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की, आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल.

काहीही असंभव नाही, ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे.

आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही.

मराठी प्रेरणादायी सुविचार 

जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल.

यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर, लोक हसत नसतील तर, तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा. पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका, आणि जर का घेतले तर, त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं, हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात, तो कधीही एकटा नसतो.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात, ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य

आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे, त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे, तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.

काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव.

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

motivational quotes in marathi whatsapp

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका, त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे.

भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही, तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीवार्द घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

“आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.”

कारण देण्यापेक्षा झालेल्या चूका मान्य करा. आयुष्यात ते महत्वाचं आहे.

“विजेते” वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट “वेगळेपणाने” करतात.

इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे…

“संधी” आणि “सूर्योदय” दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याच्या “नशिबी” दोन्ही नसतात.

“तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.”

तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल, ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल, हा निसर्गाचा अटल नियम आहे

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा - तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा, वर्तमानकाळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे.

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या.

नजरेत भरणारी सर्वच असतात पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात.

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!

मराठी प्रेरणादायी विचार 

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो.

कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.

लोकं नावं ठेवतच राहणार, पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे.

जिथे चूक नसेल तिथे माफी मागू नका आणि जिथे तुमचा आदर केला जात नाही, तिथे कधी पाय ठेवू नका.

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही शेवटी पानांनीही साथ सोडली पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुमी गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल

अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्या योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.

हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे, नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही.

motivational marathi caption instagram

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकत

तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल… आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका, उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका, त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे.

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.

नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका.

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच, कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका; संयम पाळा.

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

नाती कितीही वाईट असू दे ती कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझवु शकते

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी त्यांचं आहे.

शुन्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

रुद्राक्ष असो किंवा माणूस खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

marathi motivatioal about whatsapp 

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

नेहमी लक्षात ठेवा आपल्या मागे खेचणारे लोक, आपल्या पायखालच्या पायरीवर असतात.

ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

रस्ता सापडत नसेल तर स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता मालिक व्हायची स्वप्न बघा.

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुमच्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

ज्याच्याजवळ उमेद आहे, तो कधीही हरू शकत नाही.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

फक्त मदत मागा सगळे लायकी दाखवतील.

तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा दोन्हींचा फायदाच आहे प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन

आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो

गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र पक्के राहा.

कोणतीही चूक वाया घालवू नका त्यातून काहीतरी शिका.

यश साजरं करणं ठीक आहे पण त्यापेक्षा महत्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं.

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप!

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नहीत जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क् वाचतात.

गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचं.

चांगल्यातुन चांगले निर्माण होते वाईटातून वाईट.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत रहा.

मराठी मोटिवेशनल व्हाट्सअप सुविचार 

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं, ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात, वादळ महत्वाचं नसत, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा.

बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

चांगले काम करायचे मनात आले क ते लगेच करून टाका.

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.

तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका; कदाचित त्याने तुमचे चांगले होणार नसेल.

यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस!

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय – मौन!

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हे प्रेरणादायी विचार (Motivational Quotes in Marathi) नक्कीच प्रेरणा देत असतील. तुम्हाला आमचे हे विचार कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हाट्सअप वर मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही प्रेरणा मिळेल.

असेच नवनवीन प्रेरणादायी लेख वाचत राहण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट देत रहा आणि आमच्या ब्लॉगला बुकमार करायला विसरू नका. धन्यवाद


Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Ads before post

Ads 1

Ads 2

Ads 3 Last post