Banner image Slambook365

[200+] शुभ सकाळ मराठी संदेश | Good Morning Quotes In Marathi

Good Morning Quotes In Marathi - मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण शुभ सकाळ मराठी संदेश पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व मित्रांना शुभ सकाळ संदेश पाठवून त्यांच्या दिवसाची सुरुवात अजून सुंदर बनवू शकता. 

मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की आपल्या दिवसाची सुरुवात ही प्रेरणादायी विचारांनी व्हावी जेणेकरून आपला दिवस चांगला जाईल. आम्ही आजचे काही पॉझिटिव्ह प्रेरणादायी संदेश तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, तुम्ही संदेश आपली मित्र-मैत्रिणी नातेवाईक व इतर लोकांना पाठवून त्यांच्या दिवस आनंदाने घालवू शकता.

Good Morning Quotes In Marathi

आम्ही येथे 200+ Good Morning Marathi Massage दिलेले आहेत. जे तुम्ही सोशल मीडियावर शेअर करून इतरांना प्रेरणा देऊ शकता.

Good Morning Quotes In Marathi

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्मानेच होते.. 🌸 शुभ सकाळ!

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. 💪 शुभ सकाळ!

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

“नशीब” आकाशातून पडत नाही, किव्हा “जमिनीतून” उगवत नाही.. “नशीब” आपोआप निर्माण होत नाही.. तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो.. 🌅 शुभ सकाळ!

तीच नाती फार छान असतात ज्यात “मी/आम्ही” नव्हे; “आपण” असतो..

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तरी जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे || शुभ सकाळ ||

अडचणी आयुष्यात नव्हे. तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल… 💖 आपला दिवस शुभ असो.

प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता, नात्यांच्या अतुट शब्दांनी गुंफलेली कविता, जाणिवेच्या पलीकडच जगावेगळ गाव, यालाच तर आहे “आयुष्य” हे नाव तुमचा दिवस सुखाचा जावो.

जगातलं कटु सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.. तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे. 🌺 शुभ सकाळ

शुभ सकाळ प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुम्हाची काळजी घेणं हाच असतो.

Good Morning Quotes Marathi for Love 

सुप्रभात रात्र संपली, सकाळ झाली. इवली पाखरे किलबिलू लागली. सुर्याने अंगावरची चादर काढली. चंद्राची ड्युटी संपली. उठा आता सकाळ झाली!

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला.. 🌼 शुभ सकाळ!

कळी सारखे उमलुन, फुलासारखे फुलत जावे.. क्षणा क्षणांच्या लाटांवर, आयुष्य झुलत जावे.. 🌷 शुभ सकाळ!

एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..; पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…! 🌈 शुभ सकाळ!

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला, कोणत्याही नावाची गरज नसते… कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची, परिभाषाच काही वेगळी असते… 🌹 शुभ सकाळ!

उत्तर म्हणजे काय ते, प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही… जबाबदारी म्हणजे काय हे, त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही… 💬 शुभ सकाळ!

बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं, कधी रस्तेही घात करतात. झुकताना जरा जपून झुकावं, कधी आपलेच खंजीर खुपसतात. पाउल टाकताना जरा जपून टाकावं, कधी फुलेही काटे बनतात. मागताना जरा जपून मागावं, कधी आपलेच भावं खातात. आणि नाते जोडताना जपून जोडावं, कधी नकळत धागेही तुटून जातात. 🌞 सुप्रभात

Good morning quotes marathi text 

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते, तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते… 🌅 शुभ सकाळ!

फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास, आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास. 💖 शुभ सकाळ!

प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा… ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल. 🌹 शुभ सकाळ!

स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत, कदाचीत ती अश्रूंबरोबर वाहून जातील… त्या हृदयात जपून ठेवावीत, कारण हृदयाचा प्रत्येक ठोका, ही स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा देईल! 🌌 शुभ सकाळ!

स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त विचार Positive पाहिजेत. 🌟 शुभ सकाळ!

स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका, कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही. 💖 शुभ सकाळ!

सौंदर्य कपड्यात नाही, तर कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, तर विचारांमधे आहे. सौंदर्य भपक्यात नाही, तर साधेपणांत आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, तर मनांत आहे. 🌸 शुभ सकाळ!

सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते, कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही… 💪 शुभ सकाळ!

सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं हृदय जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे, जसे पेराल तसेच उगवेल. 🌹 शुभ सकाळ!

 Good morning quotes marathi for whatsapp

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात, ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात, यालाच तर मैत्री म्हणतात… 🌷 शुभ सकाळ!

सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हांला माणूस बनवते.. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते. 🌞 शुभ सकाळ!

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते. 🌹 शुभ सकाळ!

अश्रू असो कोणाचेही, आपण विरघळून जावे.. नसो कोणीही आपले, आपण मात्र कोणाचेही व्हावे… 💧 शुभ सकाळ!

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो. त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. 🌞 शुभ सकाळ!

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल. शुभ सकाळ!

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते.. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. मग कोणाच्याही उपयोगात न येता, गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच…! 🌸 शुभ प्रभात!

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो ! जगण्यासाठी लागतात फक्त, “प्रेमाची माणसं” अगदी तुमच्यासारखी ! 🌷 शुभ सकाळ!

नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की, जीवनात रस्ता दिसत नसेल तर, दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. 🌞 शुभ सकाळ!

Success Good morning quotes marathi

मोर नाचताना सुद्धा रडतो.. आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो.. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही.. आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. 🌹 शुभ सकाळ!

काही वेळा आपली चुक नसताना ही शांत बसणं योग्य असतं… कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…! 🌸 शुभ सकाळ!

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही पाने उलटले की जुने काही आठवत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये. 🌷 शुभ सकाळ!

देवाने प्रत्येकाच आयुष्य कसं छान पणे रंगवलय आभारी आहे मी देवाचा कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरलाय. 🌞 शुभसकाळ

चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये, तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये. 🌷 शुभ सकाळ

जीवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून “आनंद” देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका, कारण त्यांचे आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर” 🌸 शुभ सकाळ!

मानवी जीवन यशस्वी व्हायचा, तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे जिथं जिथं तडा जाईल तिथं तिथं जोड देता आला की कुठलंच नुकसान होत नाही तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. 🌷 शुभ प्रभात

सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो. कारण त्याला माहीत असते विजय हा सत्याचाच होतो. 🌞 शुभ सकाळ!

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर, आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. 🌸 शुभ सकाळ!

आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी, आपलीही बोटे सुगंधित करून जातो.. आपला दिवस आनंदी जावो! 🌷 शुभ सकाळ!

नाती तयार होतात हेच खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे, दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही, एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे… 🌹 सुप्रभात!

मोगरा कुठेही ठेवला तरी त्याचा सुगंध दरवळतो, तसेच आपली माणसे कितीही दूर असली तरी त्यांची आठवण मनाला नेहमी स्पर्श करते. शुभ सकाळ!

आवडतं मला त्या लोकांना सकाळी शुभेच्छा पाठवायला, जे माझ्या समोर नसूनही मनाच्या अगदी जवळ असतात. सुप्रभात!

Best Good Morning Quotes Marathi

आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर. एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर होतात. शुभ सकाळ!

माझ्यामागे कोण काय बोलतं, याने मला फरक पडत नाही. कारण माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही, यातच माझा खरा विजय आहे. शुभ सकाळ!

या जगात वाट दाखवणारे अनेक असतात, पण चालायचं असतं आपल्यालाच. पडल्यावर हसणारे खूप मिळतील, पण मदतीचा हात देणारे फक्त जिवलगच असतात. सुप्रभात!

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, आणि अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. शुभ सकाळ!

सगळीच स्वप्न पूर्ण होत नाहीत, ती फक्त पहायची असतात. कधी त्यात रंग भरायचा असतो, आणि अपूर्ण स्वप्नांनी निराश होण्याऐवजी नवीन स्वप्न पहायची असतात. शुभ सकाळ!

छापलेली पुस्तके वाचून ज्ञान मिळत नाही. खरे ज्ञान अनुभवांच्या पुस्तकातून मिळते, कारण त्याचे लेखक आपण स्वतः असतो. शुभ सकाळ!

नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले दिसले, तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय त्यांची खरी ओळख कळत नाही. शुभ सकाळ!

मनाने जोडलेल्या नात्यांना कधीही नावाची गरज नसते. न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषा काहीतरी वेगळीच असते. शुभ सकाळ!

जेव्हा मायेची माणसं जवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याची वेदना जाणवत नाही. शुभ सकाळ!

Positive Good Morning Quotes Marathi 

समाधान ही अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते, तो खरा सुखी होतो. शुभ सकाळ!

कोणी आपल्याला वाईट म्हटले, तर फारसे मनावर घेऊ नका. कारण या जगात असा कोणीच नाही, ज्याला सगळे चांगले म्हणतील. शुभ सकाळ!

आजचा नवीन दिवस तुमच्यासाठी नवनवीन संधी घेऊन आला आहे. प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या. सुप्रभात!

आयुष्याच्या शर्यतीत कोण पुढे आहे किंवा मागे आहे यापेक्षा कोण तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही कोणासोबत आहात, हे अधिक महत्त्वाचे आहे. शुभ सकाळ!

दुःखाच्या रात्री झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपत नाही. हेच खरे जीवन आहे. शुभ सकाळ!

तुमची सकारात्मक विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते. गुलाबासारखं बहरायचं असेल, तर काट्यांसोबत राहण्याची कला शिकायला हवी. सुप्रभात!

मानव हा एकमेव प्राणी आहे ज्याला भगवंताने हसण्याची कला दिली आहे. ती कला कधीही गमावू नका. नेहमी आनंदी रहा, हसत रहा, आणि इतरांना हसवत राहा. शुभ सकाळ!

वेळ ही वाहत्या नदीसारखी असते. एकदा स्पर्श केलेले पाणी पुन्हा स्पर्श करता येत नाही, कारण ते नदीच्या प्रवाहाबरोबर निघून जाते. तसेच, एकदा गेलेली वेळही पुन्हा येत नाही. म्हणूनच, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. सुप्रभात!

आयुष्य खूपच लहान आहे. नेहमी प्रेमाने आणि गोड बोलत राहा. धन-दौलत नाही, तर माणुसकी जपा. प्रसंग कोणताही असो—सुखाचा की दुःखाचा—मी नेहमी तुमच्या सोबत असेन. शुभ सकाळ!

फुलं कधीच एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत, कारण निसर्गाने प्रत्येक फुलाला वेगळं आणि सुंदर बनवलं आहे. पाण्यापेक्षा तहान जास्त महत्त्वाची असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. नात्यांमध्येही विश्वासाला सर्वांत जास्त महत्त्व असते. शुभ सकाळ!

Motivational Good Morning Quotes Marathi 

“माझ्यामुळे तुम्ही नाही, तर तुमच्यामुळे मी आहे” ही वृत्ती ठेवा. मग बघा, किती माणसं तुमच्याशी जोडली जातात. आपलं जगणं दुसऱ्यांसाठी मिठासारखं असावं—पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर सगळं बेचव वाटतं. शुभ सकाळ!

स्वभाव ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला कायम सर्वांची प्रिय व्यक्ती बनवते. कितीही लांब जा, चांगल्या स्वभावामुळे लोकांना नेहमी तुमची आठवण होते. चांगला स्वभाव हेच तुमचं खऱ्या अर्थाने कमावलेलं धन आहे. शुभ सकाळ!

जिव्हाळ्याचे ऋणानुबंध नसतील, तर कोणीही कोणाच्या आयुष्यात येत नाही. सुप्रभात!

आपण जे देतो, तेच आपल्याकडे परत येतं. त्यामुळे फक्त चांगलं द्या, आणि चांगलंच मिळवा. शुभ सकाळ!

दिवा कधीच बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमचं काम न बोलता करत राहा. तुमची कर्मच तुमचा परिचय देतील. शुभ सकाळ!

सोन्याचा साठा मिळवणं म्हणजे श्रीमंती नाही. तुमच्या सारखे सोन्यासारखे माणसं असणं हीच खरी श्रीमंती आहे. शुभ सकाळ!

दुःखाचे डोंगर कोसळले तरी, आयुष्याने पुन्हा सावरण्याची ताकद दिली. सुखाचे हळुवार चांदणे पाहायला शिकविले आणि गोड माणसांनी आयुष्य पुन्हा जगायला शिकविले. शुभ सकाळ!

दुसऱ्याचे हिसकावून खाणाऱ्यांचे पोट कधीही भरत नाही, आणि वाटून खाणाऱ्याला कधीही उपाशी मरावे लागत नाही. शुभ सकाळ!

Whatsapp Good Morning Quotes Marathi 

चेहरा आणि पैसा पाहून मैत्री किंवा नाते जोडणे आपल्याला आवडत नाही. आपल्याला फक्त "माणसे" महत्त्वाची वाटतात, तीही तुमच्यासारखी! शुभ सकाळ!

थंडी क्षणांची असते, पण गारवा कायमचा राहतो. ओळख क्षणांची असते, पण आपुलकी आयुष्यभराची. हीच खरी नाती मनांची. शुभ सकाळ!

तुम्ही कितीही शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात, पण एकच काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. शुभ सकाळ!

नशिबात जे आहे ते घडेल या भ्रमात राहू नका. कारण "आपण" जे "करतो" त्यानुसारच नशीब घडत असते. शुभ सकाळ!

"हो" आणि "नाही" हे दोन छोटे शब्द आहेत, पण जीवनात खूप विचारपूर्वक वापरायचे असतात. "नाही" लवकर बोलल्यामुळे खूप काही गमावले जाते, आणि "हो" उशिरा बोलल्यामुळे खूप काही संपतं. शुभ सकाळ!

जीवनात आलेल्या अपयशाला दुसऱ्यांना कारणीभूत ठरवू नका. कारण दिवा विझायला नेहमीच वारा कारणीभूत नसतो; कधी कधी दिव्यात तेलही कमी असतं. शुभ सकाळ!

आपण जे इच्छितो ते प्रत्येक वेळी मिळतंच असं नाही. पण अनेकदा आपल्याला असं काही मिळतं, ज्याची आपण कल्पना देखील केलेली नसते. हेच असतं आपल्या चांगल्या कर्माचे फळ. शुभ सकाळ!

शोधायचे असल्यास, काळजी करणारी माणसे शोधा. कारण गरजेपुरता वापरणारी माणसे स्वतःच तुमच्याकडे येतात. शुभ सकाळ!

रात्र सरली, सूर्य उगवला, आणि तुमच्या हसऱ्या चेहऱ्याने सकाळ उजळली. शुभ प्रभात!

जी माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवतात, त्यांचा आनंद ईश्वर कधीही कमी होऊ देत नाही. शुभ सकाळ!

प्रेम करणारे खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी माणसे भेटायला भाग्य लागतं. शुभ सकाळ!

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. तासभर साथ देणारी माणसे तर बसमध्येही भेटतात. शुभ सकाळ!

रिकाम्या हाती आलोय, रिकाम्या हाती जाणार—असं नाही. एक हृदय घेऊन आलोय, आणि लाखो हृदयांत स्थान मिळवून जाणार. शुभ सकाळ!

वर्षाचा विचार करणारे धान्य पेरतात, दशकाचा विचार करणारे झाडे लावतात, पण आयुष्याचा विचार करणारे माणसे जोडतात. शुभ सकाळ!

अडचणीत असाल, तर प्रामाणिक राहा. आर्थिक स्थैर्य असेल, तर साधे राहा. शुभ सकाळ!

आनंदाने जीवनाचा मळा फुलवा आणि सद्विचारांच्या रंगांनी मन रंगवा. शुभ सकाळ!

जीवनात मागण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद असतो. मागितलेलं स्वार्थ असतं, पण दिलेलं प्रेम असतं. शुभ सकाळ!

Good Morning Quotes Marathi For Male

पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. प्रयत्न करणाऱ्याला यश, सुख, आणि आनंद नक्कीच सापडतो. शुभ सकाळ!

अगरबत्ती देवासाठी विकत आणली जाते, पण सुगंध मात्र आपल्या आवडीनुसार निवडला जातो. शुभ सकाळ!

दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका. इथे प्रत्येक जण मतलबी झालाय. शुभ सकाळ!

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मनोहारी वाऱ्याची हळुवार हालचाल. रोज तुमच्या आयुष्यात अशीच सुंदर सकाळ यावी. शुभ सकाळ!

आईच्या घामाच्या एका थेंबाचीही परतफेड कुठलाही मुलगा कधीच करू शकत नाही. शुभ सकाळ!

स्वतःसाठी वेळ काढा, कारण आपण आहोत, म्हणूनच जग आहे. दुसऱ्यांसाठीही वेळ द्या, कारण ते नसतील, तर आपल्याला जगण्यात काही अर्थच नाही. शुभ सकाळ!

मला कुणाचे फेकलेले मिळू देऊ नका, मी फक्त मेहनतीच्या जोरावर यश मिळवू इच्छितो. शुभ सकाळ!

सरळ व सत्याने वागणाऱ्यांना जंगलातील सरळ झाडांसारखं कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागतात. पण हेच झाड पुढे उपयोगी पडतं. शुभ सकाळ!

सत्य कधीही हरत नाही, जिंकायला उशीर होतो इतकंच! शुभ सकाळ!

धुकं शिकवतं—दूरचं पाहण्याऐवजी एक एक पाऊल टाकत चला. रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. शुभ सकाळ!

मन आणि छत्रीचा खरा उपयोग तेव्हाच होतो, जेव्हा ते उघडले जातात. उघडलेल्या मनातून प्रेमाचा प्रकाश आणि आनंदाचा ओलावा झिरपतो, नाहीतर बंद मन फक्त ओझंच उरते. शुभ सकाळ! 🌞

साधेपणा हा कमीपणा नव्हे; तो माणसाच्या संस्कारांची ओळख असते. स्वभावातला गोडवा आणि साधेपणा टिकवा, तेच खरे आयुष्याचे मोल आहे. शुभ सकाळ! 🌼

माझ्या प्रयत्नांचा उद्देश नेहमी हाच असतो की, चांगल्या माणसांची एक सुंदर साखळी तयार व्हावी. आपण भेटू नसलो तरी, आपले विचार नेहमी मनाशी जोडलेले असतील. कारण तुमच्यासारखी माणसं हीच माझी खरी संपत्ती आहे. शुभ सकाळ! 💖

स्वतःच्या प्रगतीच्या मागे न धावता, दुसऱ्यांचे नुकसान टाळणं हाच माणुसकीचा खरा मार्ग आहे. कोणाच्याही डोळ्यात दुःखाचं पाणी आणण्यापेक्षा, त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवा. शुभ सकाळ! 🌸

Good Morning Quotes Marathi For Female 

कोकिळेचा मधुर आवाज, फुलांचा हळुवार सुगंध, आणि कोवळ्या किरणांचा गारवा आजच्या दिवसाला स्फूर्ती आणि शांतता देतो. तुमचं प्रत्येक सकाळच असं असो, आनंद देणारी! शुभ सकाळ! 🌅

शब्दांची ताकद कधी तोडते, कधी जोडते. म्हणून शब्दांचा योग्य उपयोग करा, कारण शब्दच नाती घट्ट करतात. हळवी मनं सांभाळा. शुभ सकाळ! 💬

आयुष्याचं गणित नेहमी सोपं नसतं, पण हसून-खेळून त्यातले हर एक क्षण खास बनवता येतात. कारण आपण जगत असलेला हा क्षण पुन्हा परत येत नाही. म्हणून आनंदी राहा आणि आयुष्य सुंदर बनवा. शुभ सकाळ! 😊

वेळ, नाती आणि माणसं ही जपण्यासाठी असतात. त्यांचं मोल हरवल्यावरच कळतं. तुमच्या आयुष्यातली माणसं जपा; कारण त्यांच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. शुभ सकाळ! 💕

संकटं ही नशिबाचं परीक्षण करतात, पण त्याच्यावर ठाम राहणं आपल्या धैर्याचं प्रतीक असतं. जिंकलीस तरी इतिहास, हरलास तरी इतिहासच! असं जगणं असो! शुभ सकाळ! 🌟

सूर्याची कोवळी किरणं जशी नव्या दिवसाची आस निर्माण करतात, तशीच चांगली माणसं आपल्याला आयुष्याला एक नवीन दिशा देतात. तुमचा दिवस सोन्यासारखा जावो! शुभ सकाळ! ✨

कधी आठवण आली तर डोळे झाकून त्याला टाळू नका, आणि जे काही आवडत नाही ते सांगायला उशीर करू नका. कारण भावना मोकळ्या केल्यावरच मन शांत होतं. शुभ सकाळ! 🌞

“मनात” एकदा घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरली जात नाही. मनाचं घर छोटं असलं तरी चालेल, पण त्यातल्या भावनांचं आकाश मात्र मोठं असलं पाहिजे. शुभ सकाळ! 💓

प्रेम नेहमी माणसावर करा, त्याच्या सवयींवर नाही. चुकांवर नाराज व्हा, पण त्या माणसाला सोडू नका. कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही. शुभ सकाळ! ❤️

हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्यासोबत आहे. पण जर डोळ्यांत अश्रू आले, तर त्यांना जागाही मिळत नाही. म्हणून नेहमी हसत राहा. शुभ सकाळ! 😊

मला श्रीमंतीत काही स्वारस्य नाही. तुमच्या चेहऱ्यावर माझ्यामुळे उमटलेलं एक हसू हेच माझं खरे खजिना आहे. शुभ सकाळ! 🌟

विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करतो, तेव्हा आपल्यासाठीसुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. शुभ सकाळ! 🌼

दिवा बोलत नाही; त्याचा प्रकाशच त्याचा परिचय असतो. त्याचप्रमाणे उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचं खरं ओळखपत्र ठरेल. शुभ सकाळ! ✨

आयुष्य सुंदर आहे. भरारी घ्या, इतकी उंच की आकाशाला तुमचाही हेवा वाटेल. आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. शुभ सकाळ! 🌈

गर्व करून नाती तोडण्यापेक्षा माफी मागून नाती जपा. कारण वेळ आली की पैसा नाही, माणसंच आपल्याला साथ देतात. शुभ सकाळ! 🤝

Life Good Morning Quotes Marathi 

स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत, म्हणूनच हे जग आहे. दुसऱ्यांसाठीसुद्धा वेळ काढा, कारण ते नसतील तर आपल्याला असण्याला काही अर्थ नाही. शुभ सकाळ! 🌞

जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स असेल, तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही. त्यामुळे चांगल्या कर्मांचा मार्ग निवडा. शुभ सकाळ! 💰

मैत्री टिकवायची असेल तर नात्यातल्या चुकांना सांभाळून घ्या. कारण नाती कधीही आदर्श नसतात, त्यात समजुतीचं सौंदर्य असतं. शुभ सकाळ! ❤️

माणसाला जिंकायचं असेल तर ते केवळ आपुलकीने शक्य आहे. वेळ, पैसा, सत्ता कधी साथ देतील, कधी नाही; पण माणुसकी आणि प्रेमळ स्वभाव तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाहीत. शुभ सकाळ! 🌸

मनुष्याला अडचणींची गरज असते. कारण यशाचा खरा आनंद मिळवण्यासाठी संघर्ष हा त्याचा पाया असतो. त्यामुळे अडचणींना सामोरे जा आणि जग जिंका. शुभ सकाळ! 🌟

मनात खूप काही असतं सांगण्यासारखं पण… काही वेळा शांत बसणंच बरे असतं.. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं.. एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं… जीवन हे असंच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं. !! शुभ प्रभात !!

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे. त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

नाती तयार होतात हेच खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे, दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही, एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे. सुप्रभात

नातं असा असावा जो अभिमानाने सांगता येईल, काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा, नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र, एक मिनिट विचार करून, घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. शुभ सकाळ!

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

Good Morning Suvichar Marathi 

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. शुभ सकाळ!

खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपल्या सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल.

सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही. शुभ सकाळ!

सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल.

सुखाची अपेक्षा असेल… तर दुःख ही भोगावे लागेल… प्रश्न विचारावयाचे असतील तर उत्तर हि द्यावे लागेल… हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच लावता येत नाही जगात… जीवनात यश हवे असेल… तर संकटांना सामोरे जावेच लागेल.

साखरेची गोडी सेकंदच राहते पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते.

शुभ सकाळ म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची काढलेली “आठवण” आहे. शुभ सकाळ!

एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता स्वतःवर विश्वास ठेवा. शुभ सकाळ!

नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही. संकट म्हणजे अपयश नव्हे तो यशाचाच एक भाग आहे…

निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा नाती कधीच तुटत नाही.

यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते. जेव्हा तुम्ही जिंकू लागता; तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात. शुभ सकाळ

राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. शुभ सकाळ

 शुभ सकाळ मराठी संदेश 

यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका नशिब हे लिफ्टसारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना आहे लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो.

यशस्वी व्हायचं असेल तर, सुरुवात एकट्यानेच करावी लागते !! जेव्हा तुम्ही जिंकू लागता; तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात… शुभ सकाळ

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही. शुभ सकाळ

मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या ” नेटसम्राटांना ” शुभ सकाळ

लाखो क्षण अपूर्ण पडतात, आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी, किती कष्ट घ्यावे लागतात, यशाचं शिखर चढण्यासाठी, क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो, वरून खाली पडण्यासाठी शुभ सकाळ

आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो. शुभ दिवस

हसून पाहावं, रडून पाहावं जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं आपण हजर नसतानाही आपलं नाव कुणीतरी काढावं प्रेम माणसावर करावं की माणूसकीवर करावं पण, प्रेम मनापासून करावं. सुंदर सकाळ

सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी, आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी, जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी, शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी, कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी, आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. शुभ सकाळ

संधी येत नसते, आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे. 😊 शुभ सकाळ!

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास, आणि, हरलो तरी इतिहासच… 🌄 शुभ प्रभात!

प्रत्येक वस्तू ची किंमत वेळ आल्यावरच समजते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खुप महाग विकला जातो. 💧 शुभ सकाळ!

मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात. 🌸 शुभ सकाळ!

आयुष्यात नेहमी आनंदाने जगायचं. कोणता दिवस शेवटचा ठरेल सांगता येत नाही. 🌞 शुभ सकाळ!

गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर, संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाही. 👥

दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान होत नाही – एक हास्य आणि दुसरे आशिर्वाद. 😊 शुभ सकाळ!

सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो, पण सत्य कधीच हरत नाही. संघर्ष करत असताना कधिच घाबरायच नाही, कारण माणूस त्या काळात एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते. 🌅 शुभ सकाळ!

सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार. कारण उध्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्याची शक्ती अफाट आहे. 💭 शुभ सकाळ!

तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही, अशी भीती कधीच बाळगु नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. 🦅 शुभ सकाळ!

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते, तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची, साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते… 🌞 शुभ प्रभात!

एक कोटी रुपयांचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी पाच रुपयांची मेणबत्ती उपयोगी आली.. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते! 🌅 शुभ सकाळ..! 

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल.. पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.. 🌟 शुभ सकाळ!

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरीबीची जाण असली की… बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…! 💖 शुभ सकाळ!

तर मित्रांनो आम्ही येथे Marathi Good Morning Quotes (मराठी शुभ सकाळ संदेश) दिलेले आहेत, मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर Quotes हवे असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा, आम्ही लवकरात लवकर त्या विषयावर पोस्ट करण्याच्या प्रयत्न करू.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Ads before post

Ads 1

Ads 2

Ads 3 Last post