Banner image Slambook365

माझी आई मराठी निबंध | mazi aai essay in marathi

mazi aai essay in marathi- नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये माझी आई मराठी निबंध पाहणार आहोत. हा निबंध इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.

mazi aai essay in marathi

mazi aai essay in marathi | माझी आई निबंध

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा
आई म्हणजे साठा सुखाचा
आई म्हणजे मैत्रिण गोड
आई म्हणजे मायेची ओढ

आई विषयी जितके बोलावे तितके कमीच आहे. माझी आई आमच्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सामील होऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे माझी आई. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. सकाळी मला उठविण्यापासून ते माझा नाश्ता, जेवण, शाळेची तयारी सर्व काही आई करून देते. माझ्यासोबतच घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी ती यशस्वीरीत्या पेलते. घरातील सर्वांच्या आवडी-निवडी पुरविते. खरचं स्वतःच्या आवडीचा विचार न करता, घरातील लोकांच्या आवडीने समाधान मानणारी ती आईच असते.

ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई. ते खरच आहे. चुलं, मुलं आणि घरातील सर्वांची जबाबदारी हे सर्व पेलण्याची ताकद तिच्याकडे येते तरी कुठून?

आपण सर्वजण भाग्यवान आहोत की परमेश्राने “आई” नावाचे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या घरी दिलेले आहे. मला घडविण्यात आईचा फार मोठा वाटा आहे. लहानपणापसून ते आत्तापर्यंत तिने माझ्यावर केलेले संस्कार यांमुळेच मी माझे एक सुंदर चारित्र्य निर्माण करू शकले आहे. माझी आई मला नेहमी रामायण, महाभारतातील कथा सांगते. विशेषतः त्या गोष्टीतून मिळणारा बोध ती मला स्पष्टपणे सांगते. हेच बोध मला माझे सुंदर आयुष्य घडवायला उपयोगी पडत आहेत. परीक्षेच्या अभ्यासात माझी आई मला मदत करते. बाहेरच्या स्पर्धा-परीक्षांमध्ये सहभाग घेण्यासाठी ती मला नेहमी प्रेरित करते.

बाहेरच्या जगाशी माझा संपर्क व्हावा आणि या स्पर्धेच्या युगात मी आत्मविश्वासाने उभे रहावे, हाच यामागचा तिचा उद्देश असतो. आई ही ममता आणि वात्सल्याची मुर्ती आहे. आपण कुठेही जाताना ती नेहमी आपली काळजी करते आणि योग्य मार्ग दाखविते. मी चुकीची गोष्ट केली तर माझी आई नेहमी मला समजावून सांगते. कधी-कधी ती मला ओरडते किंवा माझ्यावर रागावतेसुध्दा. पण त्या रागामध्ये तिचे प्रेमच दडलेले असते.

माझी आई एक सुंदर सुगरण आहे. सुट्टीच्या दिवशी नेहमी ती माझ्या आवडीचे पदार्थ बनविते. तसेच घरातल्या सर्वांच्याच आवडीचे पदार्थ ती नेहमी बनवत असते.

माझी आई व्यवस्थितपणाचे आणि टापटीपपणाचे उत्तम उदाहरण आहे. तिच्यामुळे आमचे घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप.राहते. तिच्यामुळेच घरातील सर्वांना निटनेटकेपणाचे महत्व समजले आहे. म्हणून आम्हालाही व्यवस्थितपणाची सवय लागली आहे.

आई म्हणजे वासराची गाय, लंगडयाचा पाय आणि दुधावरची साय अशा अनेक उपाधीनी आईचे सुंदर वर्णन केले जाते. पण आजच्या इंटरनेटच्या युगात आपला आईशी संवाद कमी होत आहे. आपण सोशल मिडियामध्ये इतके गुंतुन गेलो आहोत की, आपल्या आईसोबत बोलायला आपल्याला वेळ नाही.

मदर्स डे ला तर नुसता आईसोबत पोस्ट केलेल्या फोटोवरून आईविषयी प्रेम सिद्ध होत नाही. वेळोवेळी आईला केलेली मदत, आपल्या आईसोबत आपण घालवलेला वेळ आणि तिच्याशी बोललेले ते चार शब्द हेच आईसाठी मदर्स डे चे खरे गिफ्ट असेल. आपली आई आपल्यासाठी इतक्या गोष्टी करते की आपण तिची स्तुती करायला कमी पडतो. पण खरचं तिने केलेल्या कामाचे किंवा कधीतर तिने बनविलेल्या.

पदार्थाचे आपण कौतुक केले तर तिला किती छान.वाटेल. हा विचार आपण करायला हवा. माझी बहिण, माझी मार्गदर्शक, माझी मैत्रिण, माझा गुरू, माझे सर्वस्व माझी आईच आहे. प्रसंगानुसार माझी आई मला योग्य सल्ला देते. मला प्रेमाने व आपुलकीने वागविते. परिक्षेच्या काळात ती माझा गुरू तर कठीण प्रसंगी ती माझी उत्तम मार्गदर्शक असते.

कोणतीही गोष्ट मी माझ्या आईशी शेअर करू शकते. या परिस्थितीत ती माझी एक जवळची मैत्रिण असते. आई आपल्यासाठी इतके करते तरिही आपण म्हणतो की, आई कुठे काय करते? आई नोकरी करत नाही किंवा पैसा कमवत नाही पण घर सांभाळण्याची मोठी जबाबदारी ती विनामुल्य पार पाडते. माझी आई माझी आदर्श आहे. परमेश्राने मला इतकी सुंदर आई दिली, त्यामुळे मी परमेश्राची सदैव ऋणी आहे.

शेवटी मी एवढेच म्हणेन. .
आई माझा गुरू, आई कल्पतरू
सौख्याचा सागरू, आई माझी
मांगल्याचे सार, अमृताची धार
प्रितीचे माहेर, आई माझी

Essay on my mother in marathi | माझी आई निबंध मराठी

आई हे साक्षात परमेश्वराचे रूप आहे असे म्हणायला काही हरकत नाही. आई म्हणजे अशी व्याक्त जिची तुलना,वर्णन शब्दांमध्ये केली जाऊ शकत नाही. ती या संपूर्ण विश्वातील सर्वात चांगली व्यक्ती आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील पहिला गुरू, मार्गदर्शक ही आई असते. माझी आई ही माझ्यासाठी खूप महत्वाची व्यक्ती आहे. ती माझ्या जीवनाचा आधार आहे. तिच्याशिवाय मला आजिबात करमत नाही. ती माझ्यावर खूप-खूप प्रेम करते. ती मला प्रेमाने भूषण म्हणून हाक भारते. आईने मारलेली हाक मला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते.

माझी आई सकाळी लवकर उठते. दररोज न चुकता ती देवपुजा करते. घरातील सर्व काम ती करते. घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेते. माझी आई खूप छान स्वयंपाक करते. आईने कोणताही पदार्थ बनवला तर तो उत्कृष्ट बनतो. घरातील प्रत्येकजण आईचे कौतुक करतो. ती माझ्यासाठी नेहमी पौष्टिक आहार बनवते तसेचं शाळेत जेवण्यासाठी माझा डबा तयार करते. आईने बनविलेले जेवण मी खूप आवडीने खातो पण आईच्या हातचे दोन घास खाल्ल्याशिवाय माझे पोट भरत नाही कारण तिने मायेने भरवलेल्या घासामुळेच माझे पोट भरते.

माझी आई फारशी शिकलेली नाही पण ती जे शिकवते असे ज्ञान आपणास कोणच देऊ शकत नाही. तिला नेहमी वाटते कि माझ्या मुलाने पुढे खूप शिकावं आणि खूप मोठे व्हावे, देशसेवा करावी. पुढे खूप शिकून आईची ही इच्छा व तिचे स्वप्न मी नक्की पूर्ण करणार.

मित्रांनो, तुम्हाला या जगात सर्व काही मिळेल पण आई कुठेचं मिळणार नाही म्हणूनच मित्रांनो आईची सेवा करा.

मित्रांनो तुम्हाला mazi aai essay in marathi कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला Bookmark करायला विसरू नका.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Ads before post

Ads 1

Ads 2

Ads 3 Last post