माझे आजोबा निबंध मराठीत | maze ajoba marathi nibandh
maze ajoba marathi nibandh_ मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये माझे आजोबा या विषयावर निबंध पाहणार आहोत हा निबंध इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा निबंध इन मराठी
माझ्या आजोबांनी आता वयाची ऐशी गाठली आहे. पण ते अंगाने काटक आहेत. त्यांना कोणताही आजार नाही. याचे कारण आजोबांचे शिस्तपूर्ण जगणे, योग्य व्यायाम आणि भरपूर फिरणे रोज सकाळी आजोबा खूप लवकर उठतात. आपले सर्व कार्यक्रम आटपुन सर्वांसाठी चहा करतात आणि मग आम्हांला उठवतात. चहापान व गप्पागोष्टी झाल्यावर आजोबा घराबाहेर पडतात. सकाळचे फिरणे त्यांचे कधीही चुकत नाही.
त्यांची स्नान झाल्यानंतरची देवपूजा चूकत नसे कोणत्याही कामात अळमटळम केलेली दिसताच ते आम्हाला खडसावून जाब विचारीत व चूक समजावून देतात, कडक भाषा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. आजोबा थोडे चिडलेले दिसले की त्यांच्याशी एक शब्द देखील बोलण्याची कुणाची छाती होत नसे. त्यांच्या रागावर मौन व्रत पाळणे हाच उपाय होता.
दररोज संध्याकाळी आजोबा आपला सर्व वेळ नातवंडांशी खेळण्यात आणि गप्पागोष्टी करण्यात घालवीत. दररोज ते आम्हाला भारत-चीन, भारत-पाकिस्तान यांतील युद्धाच्या तसेच पौराणिक कथा खुलवून सांगत. भूमिगत कार्यकर्त्यांची थोर कार्ये, देशभक्तीपर रसभरीत वर्णने आम्हाला ऐकवित.
माझ्या आणि आजोबांच्या गप्पा रंगतात त्या क्रिकेटवर! क्रिकेटचा सामना हा आजोबांचा विकपॉईट. नेहमी लवकर झोपणारे आजोबा क्रिकेट सामना पाहताना मात्र रंगून जातात. आजोबांच्या या शांत, निकोप जीवनाचे रहस्य त्यांच्या होकारार्थी विचारसरणीतच असावे त्यामुळेच ते कधीही वैतागलेले नसतात. आजोबांच्या या वृत्तीचा माझ्यावरही चांगला परिणाम झाला आहे.
माझे आजोबा मराठी निबंध | grandfather essay in marathi
माझे आजोबा मला खूप खूप आवडतात. ते दररोज पहाटे उठतात. माझ्या आजोबांचे वय जास्त आहे तरीही ते थकत नाही. त्यांचा शेती हा अत्यंत आवडता व्यवसाय आहे. माझ्या आजोबांचा स्वभाव फणसासारखा मधाळ आहे. दिसायला गंभीर आहेत पण मनाने प्रेमळ आहेत. रोज सकाळी ते शेतावर जातात.
मला दर रविवारी ते त्यांच्या सोबत सकाळी शेतात घेऊन जातात. ते मला तिथे झाडाखाली अभ्यासाला, खेळायला, पशू-पक्ष्यांचे निरीक्षण करायला सांगतात अन् स्वतः मात्र शेतीची कामे करतात. तिथे मला ते पिकांची पशू-पक्ष्यांची माहिती वेळ मिळेल तेव्हा सांगतात. शेतातील झाडाला ते मला झोकाही बांधून देतात.
त्यांच्याबरोबर मला खूप खूप मजा येते. ते माझी खूप काळजी घेतात. त्यांना नेहमी वाटते की, मी खूप खूप शिकावे. ते प्रत्येक काम मन लावून आवडीने करतात. माझ्या आजोबांनी आमच्यासाठी शेतात आंबा, पेरू, डाळिंब, संत्री, केळी, सीताफळ अशा अनेक फळांची झाडेही लावली आहेत.
त्यांना हंगामानुसार खूप फळे लागतात. त्यांना मी विकतचे पदार्थ खाल्लेले अजिबात आवडत नाही. ते मला दररोज एकतरी फळ हमखास खायला देतात. त्या फळांची गोडी अवीट असते. माझ्या आजोबांनी घरासमोर सुंदर सुंदर, फुलझाडेही लावली आहेत. त्यांच्या सुंगधाने सर्व परिसर गंधित होतो.
माझे आजोबा मी आजारी पडू नये, म्हणून माझी फार काळजी घेतात. मला आईबाबांना नेहमी पौष्टिक आहार द्यायला सांगतात. माझे आजोबा हे फक्त पूर्वीची सातवीपर्यंत शाळा शिकले आहेत. पण तरी ते खूप हुशार आहेत. त्यांना वाचन करायला, नवनवीन माहिती मिळवायला फार आवडते.
त्यांनी मला पोहायला, सायकल चालवायला ही शिकवले आहे. शाळेतून घरी आल्यावर ते माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात. माझी चूक झाल्याचे लक्षात आल्यावर ते मला समजावून सांगतात. मी चांगले काम केल्यावर ते माझे तोंडभरून कौतुक करतात. मी केवळ त्यांच्यामुळे अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.
ते मला चांगले-वाईट यातील फरक सांगतात. दररोज माझा अभ्यासही माझे आजोबा घेतात. मला रोज रात्री दूध पिलास का ? म्हणून ते विचारतात. रात्री झोपताना मला कोणत्याही संताचा एक तरी अभंग व त्याचा अर्थ सांगतात. माझ्या आजोबांच्या चांगल्या संस्कारामुळे माझे बाबा उत्कृष्ट अष्टपैलू शिक्षक म्हणून सर्वत्र परिचित आहेत.
माझ्या आजोबांना मी खूप मोठे झालेले बघायचे आहे. माझ्या पाठीशी सदैव खंबीर पणे उभे राहणारे माझे आजोबा माझे खरे मार्गदर्शक, माझा मित्र आहेत. मी त्यांचे माझ्यावरील ऋण कधीच फेडू शकणार नाही. तरीही मी मोठा झाल्यावर माझ्या आजोबांना खूप खूप आनंदात ठेवणार आहे.
आजोबा तुम्ही साखरेपेक्षाही गोड,
संस्कारांना तुमच्या जगी नाही तोड…
गेलो जरी मी लांब आजोबा,
तुमचीच असेल मला सदैव ओढ…
तर मित्रांनो तुम्हाला आजच्या निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती वाचण्यासाठी तुम्ही आमच्या ब्लॉग ला Bookmark करू शकता. धन्यवाद
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा