Banner image Slambook365

माझे आई बाबा मराठी निबंध | maze aai baba marathi nibandh

maze aai baba marathi nibandh- मित्रहो आज आपण माझे आई-बाबा या विषयावर निबंध पाहणार आहोत. आपल्या जीवनात आई-बाबांचे स्थान खूप महत्त्वाचे असते. त्यांच्याशी आपलं अस्तित्व शून्य आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पोस्टला.

maze aai baba marathi nibandh

माझे आई बाबा मराठी निबंध | maze aai baba marathi nibandh

मातृदेवो भवो पितृदेवो भव!!

आपल्या आयुष्यात आई आणि बाबा यांचे समान महत्व आहे. ते दोघेही देवासमान आहेत. तरीही आईवरती लेख, कविता अनेक लिहल्या आहेत, पण वडिलांवर भव्य-दिव्य असे लेखन झालेले दिसून येत नाही. बाबांचे व्यक्तिमत्व हे चार ओळीत बंदिस्त लिहिण्यासारखं नाही. म्हणूनच मला वाटत की, बाबांवर कविता, लेख जास्त पहावयास मिळत नाहीत.

आज मी आमच्या शाळेतील एक आदर्श विदयार्थी आहे. मला घडविण्यामागे माझ्या बाबांचा मोलाचा वाटा आहे. माझे बाबा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. ते स्वतः शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय शिक्षक असल्याने आमच्या कुटुंबावर खूप चांगले संस्कार झाले आहेत, बाबांच्या खांबीर आधारामुळेच आमचे घर उभे आहेत. ते स्वतः खूप संकटातून शिकले . शून्यातून त्यांनी विश्व उभारले माझे बाबा जितके कठोर तितकेच ते प्रेमळही आहेत. अगदी फणसा सारख्या त्याचा स्वभाव आहे. मी शाळेतील शाळेबाहेरील अनेक स्पर्धेत भाग घेवून यश मिळवतो. मला बक्षिस मिळाल्यावर आई जवळ घेते तर माझे बाबा मला माहित नसताना गोड खाऊ आणतात.

माझी एखादी चूक झाल्यावर माझे बाबा, मला रागावतात. कारण माझे व्यक्तिमत्व चांगले बनावे असे त्यांना वाटते. आपला मुलगा भविष्यात एकही चूक करू नये म्हणून ते सदैव दक्ष राहतात. खरचं आई ही घराचे मांगल्य असते, तर बाबा हे घराचे आधार असतात. आई समईतल्या ज्योतीप्रमाणे असते आणि बाबा जणू समई प्रमाणे असतात म्हणूनच ज्योतीपेक्षा समईच जास्तू तापते. एखादी वाईट घटना घडली तर आई रडून मोकळी होते, पण सात्वंन मात्र बाबांना करावे लागते. आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ बाबा आहेत.

बाबांना नोकरी असूनही ते आमचे घर काटकसरीने चालवतात. पैशाचा योग्य वापर करतात. आजी-आजोबांची खूप काळजी घेतात त्यांना कधी दुखवत नाहीत. शाळेतून घरी आल्यावर दररोज थोडा वेळ आजी-आजोबा बरोबर गप्पा मारतात. सुट्टीदिवशी आमच्या सर्व कुटुंबाला ते वेळ देतात. माझेबाबा मला, खुप खुप आवडतात. त्यांनी शाळेत तसेच आमचे घरासमोर सूप झाडे लावली आहेत.

मला नेहमी वाटते की, आपण कधीही आईचे कौतुक जरूर करावे पण त्याचवेळी बार्बाचे कष्ट विसरू नये, देवकी- यशोदचे कौतुक करावे पण त्याचवेळी पुरात डोक्यावरून पुलाला घेवून जाणारा बाप वासुदेव आठवावा. चालताना बोटाला चुकून ठेच लागली तर तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडतो आई गं पण समोर मोठा साप पाहिला की मात्र मुखातून शब्द बाहेर पडतो – बापरे.. ‘मला खूप अभिमान आहे की, माझे बाबा माझ्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत त्यांच्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे.

my father marathi essay | माझे बाबा मराठी निबंध लेखन

आपल्या जीवनात आईप्रमाणेच बाबांचे ही महत्व खूप आहे. ते कडक, शिस्तप्रिय असले तरी मनाने प्रेमळ असतात. ते आपल्या कुटुंबाचा आधार असतात. कोणतेही संकट आले तरी आपल्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे असतात.

आपले व्यक्तीमत्व सुधारण्यासाठी ते कायम आपल्यावर चांगले संस्कार करत असतात. त्याचप्रमाणे माझे बाबासुध्दा अत्यंत हुशार, शिस्तप्रिय, मनाने अतिशय प्रेमळ आहेत. माझे बाबा डॉक्टर आहेत. माझ्या बाबांनी शिक्षणासाठी खूप कष्ट केले आहेत. शून्यातून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. आणि आमच्या गावामध्ये दवाखाना सुरू केला.

आपले व्यक्तीमत्व सुधारण्यासाठी ते कायम आपल्यावर चांगले संस्कार करत असतात. त्याचप्रमाणे माझे बाबासुध्दा अत्यंत हुशार, शिस्तप्रिय, मनाने अतिशय प्रेमळ आहेत. माझे बाबा डॉक्टर आहेत. माझ्या बाबांनी शिक्षणासाठी खूप कष्ट केले आहेत. शून्यातून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. आणि आमच्या गावामध्ये दवाखाना सुरू केला. आईच्या प्रत्येक कामात माझे बाबा तिला मदत करतात. त्यांनी आम्हाला विशिष्ट कामे नेमून दिली आहेत. त्यामुळे आम्हालाही काम करण्याची आणि वस्तु जागच्या जागी व्यवस्थित ठेवण्याची सवय लागली आहे.

दररोजच्या अभ्यासासोबतच बाहेरच्या स्पर्धा, परिक्षांमध्ये भाग घेण्यासाठी माझे बाबा मला नेहमी प्रोत्साहित करतात. आणि त्या अभ्यासासाठी मला मदत करतात. बाहेरच्या जगात मी आत्मविश्वासाने फिरावे, बाहेरच्या नवीन गोष्टी मला कळाव्यात असे त्यांचे मत असते.

माझे बाबा आमचे घर, घरातील सर्व खर्च काटकसरीने करतात. त्यांच्या या स्वभावामुळेच आम्हालाही काटकसरीने राहण्याची पैशाचा योग्य वापर करण्याची सवय लागली आहे.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी ते घेतात. सुट्टीदिवशी आम्हाला सर्वांना ते फिरायला नेतात. आमच्यासोबत खूप गप्पा मारतात. आम्हाला वेळ देतात. माझे बाबा आमच्या कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ आहेत. कधी माझ्याकडून चूक झाली तर मला समजावून सांगतात.

माझ्या बाबांनी आम्हाला दररोज नियमित व्यायाम करण्याची सवय लावली आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याचे महत्व मला पटले आहे. म्हणून मला नेहमी वाटते की जेंव्हा आपण आईचे कौतुक करतो तेंव्हा बाबांचे ही कौतुक केले पाहिजे. त्यांनी केलेले कष्ट आपण कधीही विसरू नयेत.

माझ्या बाबांनी आम्हाला दररोज नियमित व्यायाम करण्याची सवय लावली आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याचे महत्व मला पटले आहे. म्हणून मला नेहमी वाटते की जेंव्हा आपण आईचे कौतुक करतो तेंव्हा बाबांचे ही कौतुक केले पाहिजे. त्यांनी केलेले कष्ट आपण कधीही विसरू नयेत. धन्यवाद..

तर मित्रांनो तुम्हाला आजचा maze aai baba marathi nibandh कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आज साठी एवढेच भेटूया लवकरच पुढच्या लेखात. धन्यवाद

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Ads before post

Ads 1

Ads 2

Ads 3 Last post