Banner image Slambook365

महात्मा गांधी मराठी माहिती | mahatma gandhi marathi mahiti

Mahatma gandhi marathi mahiti- मित्रांनो आपण आजच्या या पोस्टमध्ये महात्मा गांधी विषयी मराठी माहिती पाहणार आहोत. चला तर मग महात्मा गांधींविषयी अधिक जाणून घेऊया.

mahatma gandhi marathi mahiti

mahatma gandhi marathi mahiti

मित्रांनो महात्मा गांधी एक महान स्वातंत्र्यसैनिक होते.ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महान योगदानामुळे त्यांना राष्ट्रपिता किंवा बापू म्हणूनही ओळखले जाते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेता आणि तत्वज्ञ म्हणून महात्मा गांधी यांना ओळखले जाते.

त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होतं. महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदरमध्ये दिवाण म्हणून काम करत असत.

शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी गेले. तिथे त्यांनी इनर टेंपल या गावी राहून बॅरीस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला.

इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले व भारतात परत येऊन त्यांनी वकिली केली. गांधींनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली. तिथे त्यांनी भारतीयांना मिळणारी असमान वागणूक अनुभवली होती. म्हणून असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. अशा परिस्थितीत सकारात्मक बदल आणण्यासाठी त्यांनी राजकीय कार्यकर्ते बनण्याचा निर्णय घेतला.

१९१५ मध्ये ते भारतात परतले व नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह आंदोलन सुरू केले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ब्रिटिश सरकारचा विरोध करण्यासाठी अहिंसात्मक असहकार आंदोलने सुरु केली. १९४२ मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलन चालू केले ज्यामुळे इंग्रजांना आपला देश सोडणे भाग पडले आणि अशा प्रकारे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.

गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वांचा पुरस्कार केला. नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली. सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधित केले. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणायचे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांनपासून स्वतंत्र झाला. व नंतर ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे याने गांधीजीची गोळी मारून हत्या केली. गांधीजींच्या स्मरणार्थ रघुपति राघव राजाराम हे गाण गायल जात.

मित्रांनो मला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या पोस्ट मध्ये लवकरच तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Ads before post

Ads 1

Ads 2

Ads 3 Last post