Banner image Slambook365

आज लोकमान्य टिळक असते तर निबंध | lokmanya tilak essay in marathi

lokmanya tilak essay in marathi- मित्रांनो आपण आज लोकमान्य टिळक मराठी निबंध पाहणार आहोत. तर मित्रांनो निबंध इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. तर सुरू करूया आजचा निबंध.

lokmanya tilak essay in marathi

आज लोकमान्य टिळक असते तर… | lokmanya tilak essay in marathi

धर्मरक्षणार्थ परमेश्वर खरोखर अवतरतो की नाही माहीत नाही; पण जेव्हा जेव्हा समाजात अराजक माजतं, अन्यायाचं पारड जड होतं तेव्हा तेव्हा महापुरुषांनी समाजाला तारलं आहे. मार्गदर्शन केले आहे, एक दिशा दिली आहे. लोकमान्य टिळक असेच एक महापुरुष होते. त्यांनी इंग्रजांच्या जुलुमानं गलितगात्र झालेल्या समाजात चैतन्य निर्माण केलं. अन्यायाचा प्रतिकार करण्याची समाजाला ताकद दिली; म्हणूनच त्या काळी स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी फासावरही जाणारी तरुण पिढी इंग्रजांच्या विरोधात उभी राहिली. आज संजय दत्तसारखे तरुण आमच्या तरुणांचे हीरो आहेत. समाजाला योग्य मार्गदर्शन करणारे जहाल नेते आज नाहीत.

लोकमान्य टिळकांच्या या देशात लोकमान्यांच्या विचारांची राखरांगोळी झाली आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी टिळक प्राणपणाने लढले, त्या स्वातंत्र्यातील राजकारण, शिक्षण आणि समाजजीवन भ्रष्टाचारानं लडबडून गेलं आहे. पप्पू कलानी, हितेंद्र अकूरसारखी गुंड आणि भ्रष्ट माणसं राजरोसपणे राज्य करीत आहेत. आपण सारे भाऊभाऊ, सगळे मिळून सगळंच खाऊ या न्यायाने मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत सगळेच हात धुऊन घेत आहेत. इकडे देशावरचं कर्ज आणि दारिद्र्य वाढतच आहे. शिक्षणातील भ्रष्टाचारात विद्यार्थी आणि विद्यापीठ हातात हात घालून, पुढे जात आहेत.

टिळक आज असते, तर त्यांनी अर्थी शक्ती भ्रष्टाचार निपटून काढण्यात खर्च केली असती. टिळक हाडाचे शिक्षक होते. युवकांच्या शक्तीवर त्यांचा विश्वास होता. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी त्यांनी युवकांना हाताशी धरलं असतं. आपली थारदार लेखणी, जहाल वाणी, प्रखर बुद्धिमत्ता आणि कर्तव्याची आंतरिक तळमळ या भांडवलावर त्यांनी युवकांमध्ये देशभक्तीची ज्योत जागवत ठेवली असती.

युवकांचे आरोग्य आणि चारित्र्य यावर टिळकांनी अधिक भर दिला असता. त्यासाठी त्यांनी पालकांचे आणि शिक्षकांचे वारंवार प्रबोधन केले असते. शिवजयंती आणि गणेशोत्सवात त्यांना आजच्यासारखा धांगडधिंगा अपेक्षित नव्हता. टिळक असते, तर ‘त्यापेक्षा बंद करा हे उत्सव,’ असे नक्कीच कडाडले असते. संजय दत्त, गोविंदा अशा हीरोंचे माकडचाळे पाहण्यात आयुष्य वाया घालवणाऱ्या तरुणांची शक्ती टिळकांनी भ्रष्टाचारनिर्मूलनाकडे वळविली असती. त्यासाठी देशभर दौरे करून, कडव्या निष्ठावंत तरुणांची भ्रष्टाचारविरोधी संघटना उभी केली असती. युवकांना जागं करण्यासाठी त्यांच्या वाणीइतकीच त्यांची लेखणीही तळपली असती.

भ्रष्टाचाराबद्दल लिहिताना ‘या देशातील तरुण झोपले आहेत का?’ असे लेख लिहून, त्यांनी तरुणांना जागतं ठेवलं असतं. फसवे मतदान असो, बोफोर्स तोफा खरेदी प्रकरण असो, हर्षद मेहता भ्रष्टाचार प्रकरण असो. टिळकांनी ते दडपू दिलं नसतं. ‘राज्य करणे म्हणजे भ्रष्टाचार दडपणे नव्हे’ असे जळजळीत लेख लिहून सरकारला फटकारलं असतं. शहाबानो प्रकरणात त्यांनी मुस्लिम स्त्रियांना न्याय मिळवून दिला असता. टिळक असते तर आजपर्यंत काश्मीरचं भिजतघोंगड पडलं नसतं. आपलं काश्मीर आज आपल्या पायाखाली राहिलं असतं. दाऊद इब्राहिम टोळीचे आज भारतातने लाड चालू आहेत, ते तसे लाड टिळकांनी चालू दिले नसते.

थोडक्यात आजची तरुण पिढी सरकार आणि संपत्ती जी अष्टाचाराच्या भस्मासुरात भस्म होत आहे, त्याला टिळक असते तर आचही लागली नसती. पुनश्च हरिओम् म्हणून नुसते अग्रलेखच लिहिले नसते, तर सामाजिक पुनरुज्जीवनाची त्यांनी चळवळ उभी केली असती आणि या मरगळलेल्या गलितगात्र झालेल्या समाजाला हाक देत, त्या नरकेसरीने गर्जना केली असती.

‘उषःकाल होता होता, काळरात्र झाली।
अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ।।

मित्रांनो तुम्हाला आजचा lokmanya tilak essay in marathi निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रोज अशाच नवनवीन पोस्ट साठी आमच्या ब्लॉगला भेट देत राहा. धन्यवाद

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Ads before post

Ads 1

Ads 2

Ads 3 Last post