Banner image Slambook365

माझे गाव निबंध मराठीत | Maze gav marathi nibandh

Maze gav marathi nibandh- मित्रांनो आज आपण माझे गाव मराठी निबंध पाहणार आहोत. हा निबंध इयत्ता पाचवी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तर चला मग सुरु करूया आजच्या निबंधला.

maze gav marathi nibandh | माझे गाव निबंध मराठीत

Maze gav marathi nibandh

माझ्या गावाचे नाव आहे …… जे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे. माझे गाव म्हणजे सौंदर्य, शुद्धता व शांततेचे मिलाप. हिरवीगार शेती, झाडे, पक्षी, प्राणी आणि खूप काही माझ्या गावात पाहायला मिळतं. गावातील तळ्याकाठी असंख्य फुलं फुलतात व वारा आला कि ते डोलू लागतात. इथे उगवलेले अन्न शुद्ध, स्वच्छ व पौष्टिक असते.

गावात जवळपास एक हजार लोक राहतात. शेती हाच गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात दोन तळे व अनेक विहरी आहेत त्यामुळे पाण्याची कमतरता नाही. गावातील लोक अतिशय साधे भोळे आहेत व आपसात मिळून मिसळून राहतात.

माझ्या गावात ….. मंदिर ही आहे. गावातील सर्व लोक या मंदिरात भक्ती भावाने पूजा करतात. …… जयंतीला या मंदिराजवळ जत्रा भरते, त्यावेळीस भजन-कीर्तनाचे कार्यक्रम असतात.

समुद्रकिनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे गावातले वातावरण नेहमी थंड व प्रसन्न असते. गावातील काही लोक मत्स्य व्यवसाय ही करतात. संध्याकाळी बरीच लहान मुले व तरुण मंडळी समुद्र किनारी फेर फटका मारायला जातात.

खरंच माझे गाव खूप सुंदर आहे.

माझे गाव निबंध | my village essay in marathi

माझ्या गावाचे नाव …… आहे. ते डोंगराच्या पायथ्याशी वसलेले एक निसर्गरम्य गाव आहे. माझ्या गावातील डोंगर, नदी, झाडे, झुडूपे, पशु-पक्षी या नैसर्गिक अलंकारांमुळे माझे गाव एकदम खुलून दिसते. माझ्या गावामध्ये आमचे एक छोटेसे घर आहे. तिथे माझे आजी-आजोबा राहतात. सुट्टी लागली की मी नेहमी आमच्या गावात येते.

माझ्या गावाची लोकसंख्या 1 हजारांपेक्षा अधिक आहे. तिथे सर्व लोकांची घरे एक सारखीच आहेत. ना तिथे उंच इमारती ना मोठे बंगले. त्यामुळे तिथे शहरासारखे मला इमारतींचे पर्वत नसून हिरवेगार खरे पर्वत बघायला मिळतात. त्यामुळेच मला गावाकडे शुध्द खेळती हवा अनुभवायला मिळते.

माझ्या गावाकडे मला गाय, बैल, घोडा, कुत्रा, बकरी, मांजर, म्हैस असे विविध प्राणी बघायला मिळतात. म्हशीचा गोठा, कोंबडयांचे खुराड अशा अनेक गोष्टी मला तिथे बघायला मिळतात. माझ्या गावातील लोक अतिशय मनमिळाऊ आणि प्रेमळ आहेत. वर्षातील सगळे सण, सर्व लोक एकत्र येऊन गोडीने साजरे करतात.

कोणत्याही कामासाठी ते एकमेकांच्या मदतीला तयार असतात. अशा या एकोप्यामुळे माझे गाव आदर्श गाव म्हणून आळखले जाते. गावाच्या मध्यभागी देवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराला मोठे प्रशस्त असे आवार आहे. माझ्या गावातील नदीमध्ये मी पोहायला जाते. नदीमध्ये पोहण्याचा आनंद विलक्षण असतो.

नदीकाठी वसलेली हिरवीगार शेती आणि समोर उंच उंच डोंगररांगा हे दृश्य अतिशय सुंदर दिसते. गावातील पहाटेचा सुर्योदय जसा मनाला भुरळ घालणारा असतो, तसाच सायंकाळचा सुर्यास्तसुध्दा मनाला हुरहुर लावून जाणारा असतो.

सुर्योदयापूर्वी उठल्यानंतर वातावरणाची शोभा अप्रतिम असते. गोठयातील जनावरे चरायला निघतात. घराभोवती असलेली आंबा, चिकू, माड या झाडांवरून पक्ष्यांचा मंजुळ आवाज ऐकू येतो. असे माझे सुंदर गाव मला खूप आवडते. म्हणून दर सुट्टीत नवा अनुभव घेण्यासाठी मी माझ्या गावी जाते.

माझे आदर्श गाव मराठी निबंध | maze gaon marathi nibandh

स्वच्छ, सुंदर, घाणीमुक्त माझे गाव
“अभिमानाने सांगतो, ऐका तुम्ही राव.
स्वच्छ, सुंदर, घाणीमुक्त माझे गाव.”

माझ्या गावाचे नाव ……. आहे. माझे गाव छोटेसे सुंदर आणि आदर्श आहे. माझे गाव लगेच आदर्श स्वच्छ, सुंदर, घाणीमुक्त बनले नाही. घाणीमुक्त स्वच्छ गाव करण्यासाठी गावातील प्रत्येकाने, सर्व लोकांनी प्रयत्न केले. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली. लोकांनी स्वयंप्रेरित होऊन सहविचार बैठक घेतली.

या बैठकीत गाव घाणीमुक्त बनवण्यासाठी नियोजन करण्यात आले. ज्यात शौचालय बांधणे व त्याचा वापर करणे, कचरापेट्यांचा वापर करणे, वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करणे, प्लास्टिक बंदी, तंबाखू- धुम्रपान करण्यास बंदी, स्वच्छतेच्या साधनांचा वापर या गोष्टींचा समावेश होता. गावातील साफसफाई वर लक्ष केंद्रित करण्यात आले. लोकांनी घरे स्वच्छ केली. परिसर स्वच्छ केला. गावातील शाळांमध्ये स्वच्छतेवर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या.

“स्वच्छता अंगीकारूया, घाणीला दूर सारू.”
“गावाला स्वच्छ घाणीमुक्त करायचे आहे,
यासाठी सर्वांनी योगदान द्यायचे आहे.”
“शौचालयाचा वापर करू, प्लास्टिकला दूर सारू.
चला आपले गाव स्वच्छ, सुंदर, घाणी मुक्त करू.”

गावात जागोजागी स्वच्छ, घाणीमुक्त गाव बनवण्यासाठी अशा स्लोगन लिहिण्यात आल्या. बॅनर लावण्यात आले. त्या संबंधित चित्रे पेंट करण्यात आली. याप्रमाणे नियोजनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली.

गावातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शाळेतील शिक्षक, आरोग्य कर्मचारी, तंटामुक्त समितीतील सदस्य, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, गावातील सर्व स्त्री-पुरुष या दिशेने प्रयत्न करू लागले. आणि त्याचे फळ आम्हाला मिळाले,

“स्वच्छ घाणीमुक्त गाव.”
“अभिमानाने सांगतो, ऐका तुम्ही राव.
स्वच्छ, सुंदर, घाणीमुक्त माझे गाव.”

तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन मराठीत माहितीसाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क करायला विसरू नका.

Previous article
Next article
This Is The Oldest Page

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Ads before post

Ads 1

Ads 2

Ads 3 Last post